Monday, 24 November 2014

दूर दृष्टीचा जाणता नेता शरद पवार

गेली ५० वर्षे शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकारणाचे केंद्र बिंदु आहेत. दूर दृष्टीचा जाणता नेता शरद पवार या पुस्तकातून लेखक रविकिरण साने यांनी शरद पवार यांचा विविधांगी परिचय करून दिला आहे. शरद पवार चाहत्यासोबतच राजकारणात रस असलेल्यांना हे पुस्तक नक्कीच आवडेल कारण शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दी सोबतच तत्कालीन राजकीय परीस्थिती ही या पुस्तकातून मांडण्यात आली आहे.

Wednesday, 15 October 2014

सरमिसळ


''सरमिसळ'' हे जयवंत दळवी लिखित विनोद कथांचे पुस्तक आहे.
नावप्रमाणे या पुस्तकात लेखकाने विनोदी कथांची सरमिसळ केली आहे. विनोदी कथांच्या वाचकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल. चंद्रमोहन कुलकर्णी निर्मित मुखपृष्ठ खूपच आकर्षक आहे. विशेष नोंद करावी लागेल ती न्हणजे या पुस्तकांच्या निर्मितिमूल्याची.   

Wednesday, 3 September 2014

अज्ञात विवेकानंद

अज्ञात विवेकानंद हे पुस्तक बंगाल मधील ख्यातनाम लेखक शंकर यांनी बंगाली भाषेत लिहिलेल्या "अचेना अजाना विवेकानंद'' पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद मृणालिनी गडकरी यांनी केला आहे.

नुकतेच स्वामी विवेकानंद यांची १५० वी जयंती भारत व जगभरात मोठ्या उत्सवात साजरी झालेली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल माहिती सर्वांना असते पण स्वामी विवेकानंद यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी
लेखकांनी खूप संशोधन हे पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल  बरीच नवीन माहिती या पुस्तकातून मिळते. 

स्वामी विवेकानंद यांच्या पूर्वज व कुटुंबियांची माहिती, स्वामी विवेकानंद यांची गुण पत्रिका, स्वामी विवेकानंद यांचे पाक कलेवरील प्रेम, त्यांनी स्वयंपाकात केलेले विविध यशस्वी व अनयशस्वी प्रयोग अशी बरीच माहिती या पुस्तकातून मिळते. सोबतच पुस्तकाची भाषा रंजक असून मध्ये मध्ये किश्याची पेरणी केली आहे.